मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वे सेवा विस्कळीत

Last Updated: Thursday, June 28, 2012, 10:52

मुंबईत रात्रभर बरसलेल्या पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल एक तास उशिरानं धावत आहे. तर हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या हजेरीनं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झालीय.