राज ठाकरेंचं चुकलं कुठे? – अजित पवार

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 16:28

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठ राखण केली आहे. राज ठाकरे यांनी सभेसाठी शिवाजी पार्क मागितलं, तर त्यात चुकीचं काय, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.