Last Updated: Thursday, July 12, 2012, 23:17
नक्षलवाद्यांच्या उच्छादामुळे आधीच दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता लोकशाही धोक्यात आलीय. कोरची या अतिदुर्गम तालुक्यात आज ९० टक्के ग्रामपंचायतीतल्या लोकप्रतिनिधींनी एकाच दिवशी सामूहिक राजीनामे दिल्यानं प्रशासन हादरलंय. याशिवाय एकाच दिवशी ३० पोलीस पाटलांनीही राजीनामे दिलेत.