'त्या' क्रुरकर्म्याची फाशी कायम, न्यायालय म्हणतं...

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 23:46

पुण्यात बेदरकारपणे बस चालवून ९ जणांचा बळी घेणा-या संतोष मानेची फाशी सत्र न्यायालयानं कायम ठेवलीय.

९ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची फाशी कायम

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 14:02

बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.

संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती...

Last Updated: Saturday, September 21, 2013, 16:28

स्वारगेट स्थानकातून भरधाव वेगात बस पळवून नऊ जणांना चिरडणाऱ्या संतोष मानेच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय. संतोष मानेचे वकील जयदीप माने यांनी ही माहिती दिलीय.

नऊ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला फाशी

Last Updated: Monday, April 8, 2013, 13:54

पुणेकरांचा गुन्हेगार संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज पुण्याच्या सत्र न्यायलयाने हा निकाल दिला आहे. संतोष माने हा राज्यासाठी कलंक होता, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.

संतोष मानेवर गुन्हा सिद्ध, नऊ जणांची केली हत्या

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 20:12

पुण्यात बेदरकारपणे बस चालवून अनेकांचे जीव घेणारा संतोष माने याला कोर्टानं दोषी ठरवलंय. खून आणि खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं नुकसान या आरोपांखाली संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलंय. त्याला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

अपराध घडे, 'सीसीटीव्ही' पाही भलतीकडे !

Last Updated: Friday, January 27, 2012, 19:13

महापालिकेनं ९ कोटी रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र त्यामध्येच आता खूप त्रुटी असल्याचं समोर आलं आहे.

नाही घेणार.. माथेफिरू संतोष मानेचं वकीलपत्र

Last Updated: Thursday, January 26, 2012, 20:52

पुणेकरांचा गुन्हेगार संतोष मानेला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचं वकीलपत्र घ्यायला वकिलांनी नकार दिला आहे.

संतोष माने माथेफिरू होता की नाही? मतभेद

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 17:10

पुण्यातील संतोष संतोष मानेच्या नातेवाईकांनी तो मनोरुग्ण असल्याचा दावा केला असला तरी एसटीच्या अधिकाऱ्यांनी मात्र संतोष मनोरुग्ण नसल्याचं म्हंटलं आहे. एसटीचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली. तसं असतं तर त्याला सेवेत घेतलं नसतं, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

माथेफिरूने कसा घातला हैदोस...

Last Updated: Wednesday, January 25, 2012, 15:51

पुण्यात संतोष माने या माथेफिरु एसटी ड्रायव्हरनं बस पळवून वाटेत येणाऱ्यांना अक्षरशः चिरडलं. त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झालाय, तर पंचवीस जण जखमी झालेत. संतोष माने या माथेफिरुनं सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला पुण्याच्या स्वारगेट डेपोमधून एसटी बस पळवली.