वर्सोवा घाटकोपर दरम्यान मेट्रोची 12 स्टेशन

Last Updated: Saturday, June 7, 2014, 17:28

वर्सोवा घाटकोपर दरम्यान साडे अकरा किमीच्या दरम्यान 12 स्टेशन असतील. मेट्रोचा प्रवास वर्सोव्यापासून सुरू होऊन डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर, आणि घाटकोपर शेवटचे स्थानक असेल. मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरूवातीला बेस्ट भाड्याच्या दीडपट असेल असा अंदाज आहे. यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 10 रूपये तर जास्तीत जास्त 40 रूपये इतकं असेल असा अंदाज आहे.

मुंबई मेट्रोचा केवळ 10 रुपयात कुल प्रवास

Last Updated: Saturday, June 7, 2014, 16:06

मुंबईकरांच्या सेवेत बहुप्रतिक्षित मेट्रो रेल्वे उद्यापासून धावणार आहे. 10 रुपयामध्ये कुल प्रवास करता येणार आहेत. महिनाभरासाठी केवळ 10 रुपये तिकीट दर आकारण्याच्या निर्णय रिलायन्सने घेतला आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सुरु होत आहे.

भारतीय चलनात कागदाऐवजी प्लास्टिक नोटा

Last Updated: Friday, February 7, 2014, 21:41

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १० रूपयांच्या प्लास्टिक नोटा जूननंतर चलनात येणार आहेत. २०१४ च्या उत्तरार्धात या नोटांचे फिल्ड परीक्षण होणार आहे. कोच्ची, म्हैसूर, शिमला, जयपूर, भूवनेश्वर या शहरात प्लास्टिकच्या नोटा सर्वात आधी परीक्षणासाठी चलनात आणल्या जातील.

१० रुपयांच्या प्लास्टिकच्या ‘खऱ्याखुऱ्या’ नोटा

Last Updated: Saturday, December 15, 2012, 20:04

आता लवकरच आपल्याला प्लास्टिकच्या पण खऱ्याखुऱ्या नोटा पाहायला मिळणार आहेत. अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी राज्यसभेत ही घोषणा केलीय.