ज्वालामुखीच्या तोंडावर डोंबिवली

Last Updated: Friday, December 6, 2013, 23:39

डोंबिवली हे शहर भयानक ज्वालामुखीच्या तोंडावर वसलंय, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरालगत असलेल्या दावडी गावातल्या एका भंगार डेपोत केमिकलच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झालाय. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की या टाकीच्या धातूचे तुकडे तब्बल 3 किलोमीटर अंतरापर्यंत फेकले गेले. डोंबिवलीकरांना भोगाव्या लागणा-या दुष्टचक्रावर हा एक विशेष रिपोर्ट..

डोंबिवली केमिकल स्फोट : तिघांना घेतले ताब्यात, आग विझली

Last Updated: Friday, December 6, 2013, 16:14

डोंबिवलीमध्ये कल्याण शीळ फाटा रस्त्यावर असलेल्या गायवाड कंपाऊंडमधील एका भंगाराच्या गोदामात भीषण स्फोट झाला. भंगार डेपोतील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाला असून या स्फोटाने तिघांचा बळी घेतलाय. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.

डोंबिवलीत केमिकल टँकमध्ये स्फोट, चार ठार

Last Updated: Friday, December 6, 2013, 12:24

डोंबिवलीमध्ये कल्याण-शीळ रस्त्यावर गायकर कंपाऊंड इथं ठेवलेल्या भंगाराच्या केमिकल टँकमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटात चार जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.