Last Updated: Friday, December 6, 2013, 12:24
www.24taas.com, अमित भिडे, डोंबिवलीडोंबिवलीमध्ये कल्याण-शीळ रस्त्यावर गायकर कंपाऊंड इथं ठेवलेल्या भंगाराच्या केमिकल टँकमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटात चार जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
हा स्फोट एवढा भीषण होता की, दोन किमी परिसरातल्या इमारतींना या स्फोटाचे हादरे जाणवले...स्फोट झाल्यावर उरलेल्या तीन टाक्या आजूबाजूच्या चाळीवर येऊन पडल्या.
याठिकाणी दोन फायरब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्यायत... याठिकाणी अजूनही आग मोठ्या प्रमाणात वेगानं पसरतेय. एमआयडीसी परिसरातल्या दावडीनाका परिसरात ही घटना घडलीय.
सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 6, 2013, 11:33