अबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब

Last Updated: Thursday, April 10, 2014, 19:33

अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.

अमरातीमध्ये कपडा दुकानाला आग, ७ जणांचा मृत्यू

Last Updated: Sunday, March 30, 2014, 16:04

अमरावतीमध्ये एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत कोतवाल कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. अमरावतीतील परतवाडा रोड इथल्या टिळकचौकातील ही घटना आहे.

अडसूळांविरोधात नवनीत राणाची विनयभंगाची तक्रार

Last Updated: Monday, March 17, 2014, 11:21

अमरावतीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत कौर यांनी विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय. गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये नवनीत यांनी आपल्या पतीसह जावून तक्रार दाखल केली.