Last Updated: Sunday, March 30, 2014, 16:04
www.24taas.com, झी मीडिया, अमरावतीअमरावतीमध्ये एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. अमरावतीतील परतवाडा रोड इथल्या टिळकचौकातील ही घटना आहे.
परिसरातील `वृंदावन फॅशन` नावाच्या कपड्याच्या शोरूमला आज पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. तीन मजली हे शो रूम होतं. १ आणि २ माळ्यावर दुकान आणि तिसऱ्या माळ्यावर डॉ. गोठवाल यांचं कुटुंब राहत होतं. कुटुंबात १० सदस्य होते. त्यातील तीन जणांना आपला जीव वाचवण्यात यश मिळालं असून सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
ही आग शॉर्टसर्किटमुळं लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मृतांमध्ये ४ महिला, १ पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
मृतकांची नावं१. रवी रमेश गोठवाल (३० वर्ष)
२. निकिता रवी गोठवाल (२५ वर्ष)
३. पूनम आनंद गोठवाल (३० वर्ष)
४. वेद आनंद गोठवाल (४.५ वर्ष)
५. वेदिका आनंद गोठवाल (३ महिने)
६. विमल रमेश गोठवाल (५४ वर्ष)
७. शीतल अरविंद गोठवाल (२८ वर्ष)
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 30, 2014, 09:51