सचिनच्या मनातील क्रिकेट कसे काढणार? - अंजली

Last Updated: Saturday, November 16, 2013, 20:14

वानखेडे स्टेडियमवरील फॅन्सचं प्रेम पाहून मास्टर ब्लास्टर सचिनही भारावला. त्याच्या डोळ्यातही अश्रू तरळले.. तर सचिनची पत्नी अंजलीलासुद्धा भावना आवरणं कठीण झालं होतं. सचिनविना क्रिकेट शक्य आहे. मात्र क्रिकेटविना सचिन ही कल्पना करुच शकत नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया तिनं दिलीय.