Last Updated: Saturday, November 16, 2013, 20:14
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईवानखेडे स्टेडियमवरील फॅन्सचं प्रेम पाहून मास्टर ब्लास्टर सचिनही भारावला. त्याच्या डोळ्यातही अश्रू तरळले.. तर सचिनची पत्नी अंजलीलासुद्धा भावना आवरणं कठीण झालं होतं. सचिनविना क्रिकेट शक्य आहे. मात्र क्रिकेटविना सचिन ही कल्पना करुच शकत नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया तिनं दिलीय.
वानखेडेवर वातावरण भावूक झाले होते. सचिन....त्याचं कुटुंबीय आणि क्रिकेटप्रेमींना अश्रू अनावर झाले होते. मास्ट-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आमच्या कुटुंबाचा एक सदस्य असल्याचं मत सामान्य क्रिकेट फॅन्सनी व्यक्त केलं आहे. सचिनचे मैदानावरचे अखेरचं क्षण डोळ्यात साठवून घेण्यासाठी सर्वचजण आसुसले होते. सचिनला अलविदा करण्याचे सुंदर क्षण, सचिनचं भावूक भाषण ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी दादरकरांनी तर टीव्ही शोरुमच्या बाहेरही गर्दी केली होती.
सचिन ख-या अर्थानं दादरमध्ये घडला. त्यामुळं सचिनच्या निवृत्तीनंतर सर्वाधिक भावूक झाले ते दादरकर.
सचिन तेंडुलकर ही जगात भारताची ओळख बनलाय. सचिनला भारतरत्न द्यावं अशी मागणी स्वत: भारतरत्न असणा-या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलीय. सचिन तेंडुलकरची निवृत्ती ही मनाला चुटपूट लावणारी आहे. त्यानं किमान वर्षभर तरी क्रिकेट खेळायला हवं होतं, अशी खंतही त्यांनी यावेळी केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 16, 2013, 14:42