सुरेश खोपडे हे`आप`चा हिट फॉर्म्युला, बारामती करणार सर?

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 22:14

लोकसभा निवडणुकीची`आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रीतील उमेदवारांसाठी ही तिसरी यादी आहे. या यादीत १७ उमेदवारांची नावे जाहीर केलीत. माजी आयपीएस सुरेश खोपडे बारामतीतून तर रघुनाथदादा पाटील हातकणंगलेतून रिंगणात, निहाल अहमद धुळ्यातून मैदानात आहेत. मात्र, खोपडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

‘आप’ची मुंबईत तोडफोड, चौकशी करणार – आर आर

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:07

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या रिक्षा आणि लोकलमध्या प्रवासाचा गोंधळ चर्चगेट स्टेशनवर दाखल झाल्यानंतरही कायम होता. उत्साही कार्यकर्त्यांनी सुरक्षा यंत्रणेची तोडफोड केली. या तोडफोडीची चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

‘आप’ने काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकले!

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 16:10

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भारताचा नकाशाच बदलून टाकला आहे. काश्मीरला पाकव्याप्त पाकिस्तानात दाखविला आहे. हा नकाशा त्यांनी `आप`च्या संकेतस्थळावर टाकला टाकला आहे. त्यामुळे `आप` ची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, `आप` ने तात्काळ हा नकाशा आपल्या साईटवरून हटविला आहे.

मोदी, केजरीवाल, लालू यांच्याशी फेसबुक लाईव्ह संवाद

Last Updated: Thursday, February 20, 2014, 23:09

आता राजकीय नेत्यांशी तुम्ही लाईव्ह संवाद साधू शकता. यासाठी फेसबुकने तशी व्यवस्था केली आहे. सोशल नेटवर्कींगमधील आघाडीच्या फेसबुकने एक विशेष पेज तयार केले आहे. या पेजवरून कोणीही फेसबुक वापरकर्ता नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, लालूप्रसाद यादव आणि अखिलेख यादव यांच्याशी लाईव्ह संवाद साधू शकणार आहे.

अरविंद केजरीवाल जनलोकपालसाठी होणार `शहीद`

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 09:32

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता जनलोकपालच्या मुद्यावरून `शहीद` व्हायची तयारी सुरू केलीय. जनलोकपाल विधेयक संमत झाले नाही तर राजीनामा देऊ, अशी भाषा केजरीवाल करतायत. त्यामुळं अखेरीस राष्ट्रपतींनाच त्यांना कानपिचक्या द्याव्या लागल्यात.

आम आदमीला राज्यात परिवर्तनाची स्वप्नं

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 18:47

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने यश मिळवल्यानंतर आता राज्यातही आम आदमी पार्टीच्या नेत्यांना परिवर्तनाची स्वप्नं पडू लागलीयत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभा मतदार संघात मारुती भापकर किंवा उल्का महाजन या निवडणूक लढवतील, अशी घोषणाच स्थानिक पातळीवर करण्यात आलीय.

`आप`ला आश्वासनाचा विसर, केजरीवाल यांचे घर १० खोल्यांचे

Last Updated: Saturday, January 4, 2014, 09:30

स्वतःची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्याचं सांगत वारंवार कौतुक करवून घेणा-या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीचे खरेखुरे दर्शन आता होऊ लागलं आहे. आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री झालो तरी सरकारी गाडी, बंगला घेणार नाही असं सांगणा-या आम आदमी पार्टीला या आश्वासनाचा लगेचच विसर पडल्याचं दिसतंय.

`आप` म्हणजे `झोळीवाल्यांची नवी फौज`, शरद पवारांचा टोला

Last Updated: Monday, December 9, 2013, 09:30

विधानसभा निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया आलीय. ‘आप’च्या विजयावर त्यांनी उपरोधिक टोला लावत `झोळीवाल्यांच्या नव्या फौजा` असं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेबसाईटवर शरद पवारांनी आपली ही प्रतिक्रिया दिलीय.

दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेशात भाजपचीच जादू

Last Updated: Sunday, December 8, 2013, 21:35

दिल्ली आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा सत्ता खेचून आणली आहे. या आधीच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. तर मध्य प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत राहण्याचा मान भाजपने पटकावला आहे.

केजरीवालांच्या `झाडू`नं केला दिल्लीत `काँग्रेसचा सफाया`

Last Updated: Sunday, December 8, 2013, 11:52

दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणाऱ्या काँग्रेचा सफाया केलाय. मुख्य म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव अरविंद केजरीवाल करणार हे निश्चित झाले आहे. केजरीवाल यांनी ५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.