पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 21:59

पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही.

पुण्यात चार बॉम्बस्फोट, एक जखमी

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 21:23

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास पाच ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . गरवारे कॉलेज, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी बॉम्बस्फोटच असून, यात एक जण जखमी झाला आहे. आर डेक्कन मॉलजवळ पाचवा स्फोट झाला आहे.

मराठी सिनेमांचा राष्ट्रीय पुरस्करांत दबदबा

Last Updated: Thursday, May 3, 2012, 19:55

राष्ट्रीय पुरस्करांवर दबदबा आहे तो मराठी सिनेमांचा, आणि कलाकारांचा.. देऊळ या सिनेमाला सुवर्णकमळानं गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेल्या गिरीश कुलकर्णीचाही सन्मान करण्यात येणार आहे.. गिरीशला सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा पुरस्कारही मिळाला.

'शाळा'चे यश सर्व टीमचे- सुजय डहाके

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 15:10

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर झी २४ तासशी बोलताना सुजय डहाके म्हणाला की हा माझा पहिलाच सिनेमा आणि त्याला पुरस्कार मिळत आहे याचा खूप आनंद आहे.

'देऊळ'ला राष्ट्रीय पुरस्काराचा सुवर्ण 'कळस'

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 22:55

दिल्लीत ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार आनंद भाटे यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.