शतक झालं पूर्ण... सिनेसृष्टीचं !

Last Updated: Thursday, May 3, 2012, 12:18

३ मे १९१३ चा दिवस उजाडला तोच मुळी भारतीय सिनेसृष्टीचं उज्वल भवितव्य घेऊन. हलत्या चित्रांच्या ध्यासानं पछाडलेल्या दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरीश्चंद्र' हा पहिला मूकपट निर्माण केला आणि इथूनच सिनेसृष्टीचा खऱ्या अर्थाने उदय झाला.