Last Updated: Thursday, May 3, 2012, 12:18
www.24taas.com, मुंबई 
३ मे १९१३ चा दिवस उजाडला तोच मुळी भारतीय सिनेसृष्टीचं उज्वल भवितव्य घेऊन. हलत्या चित्रांच्या ध्यासानं पछाडलेल्या दादासाहेब फाळके यांनी 'राजा हरीश्चंद्र' हा पहिला मूकपट निर्माण केला. आणि इथूनच सिनेसृष्टीचा खऱ्या अर्थाने उदय झाला. त्यानंतर १९३१ साली 'आलम आरा' हा पहिला बोलपट पडद्यावर झळकला आणि सिनेमा बोलू लागला.
त्यानंतर हळुहळू कृष्णधवल सिनेमाने रंगीत साज चढवला. उत्तरोत्तर हा सिनेमा समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करु लागला. अभिनय संपन्न कलाकार, उत्कृष्ट संगीत असलेल्या या सिनेमाची परिभाषाच बदलली. सिनेमा अधिकाधिक बोल्ड आणि व्यावसायिक झाला. आणि याच काळात म्हणजे २००९ साली परेश मोकाशी दिग्दर्शित हरीश्चंद्राची फॅक्ट्री पडद्यावर झळकला.
तब्बल ९६ वर्षांनी सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जीवनपट या सिनेमातून उलगडण्यात आला. असा हा भारतीय सिनेमाचा आजवरचा प्रवास. आज भारतीय सिनेमा शंभराव्या वर्षात पदार्पण करतो आहे. आणि त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे.
First Published: Thursday, May 3, 2012, 12:18