चर्चगेट-विरार गाडीत २ नायजेरियन तरुणांचा गोंधळ

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 12:19

गोव्यात नायजेरियन लोकांनी रस्त्यावर धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या लोकलमध्येही असाच प्रकार घडला. रविवारी मध्यरात्री विरारला जाणार्या लोकलमध्ये दोन नायजेरियन तरुणांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर मीरा रोड स्थानकात १० ते १२ प्रवाशांना मारहाणही केली. त्यानंतर खवळलेल्या प्रवाशांनीही या दोघांना प्लॅटफॉर्मवरच बदडून पिटाळून लावलं.

मुंबई असुरक्षित? मध्यरात्री दोन चोरीच्या घटना

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 08:54

मुंबईच्या जोगेश्वरीत तब्बल १० किलो सोनं चोरी झाल्याची घटना समोर आलीय. जोगेश्वरीच्या अंबिका ज्वेलर्समध्ये ही चोरी झाली असून चोरी गेलेल्या सोन्याची किंमत २ कोटी ४० लाख इतकी आहे. या दुकानात काम करत असलेल्या नोकरानंच ही चोरी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तो सध्या फरार आहे.