मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 15:15

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत कमळ हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.

`कमळ` झळकावल्यानं मोदींविरोधात काँग्रेसची तक्रार

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 13:12

कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी कमळ हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटलंय. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.

लोकसभा निवडणुकीवर जोरदार सट्टा, `आप`कडे लक्ष

Last Updated: Friday, March 7, 2014, 12:49

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सट्टा बाजारातही तेजी आल्याचं चित्र आहे. देशभरातले सट्टेबाजांनी बोली लावायला सुरुवात केलीये. कोण भाजपला पसंती देतायेत तर कोण पंजावर पैसे लावण्यास इच्छुक आहेत. तर काहींचा आम आदमी पार्टी चमत्कार करेल यावर विश्वास आहे.

LIVEलोकसभा निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 13:21

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या १६व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज जाहीर झाली. सहा ते सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

‘खूनी पंजा’मुळं मोदी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 20:31

काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख खूनी पंजा असा केल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना नोटीस बजावलीये. १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगानं दिलेत. मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसनं आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती.

राहुल गांधीनी निवडणूक आयोगाला दिलं उत्तर

Last Updated: Friday, November 8, 2013, 18:42

ISIच्या मुद्यावरून अडचणीत आलेल्या राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिलंय. मी आचार संहितेचे मी उल्लंघन केलेले नाही. माझ्यासमोर जे तथ्य आले ते मी बोललो.