गुढी पाडवा आणि गावातील कोरडेपणा...

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 20:44

गुढी पाडवा... हिंदू नववर्षदिन.... पाडव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे.. जसा गाव तशा चालीरीती... अगदी मैलामैलांवर गावातील चालीरिती बदलतात.... मुंबईच्या वेशीवर असलेलं माझं गावही याला अपवाद नाही. बालपणाच्या त्या आठवणी अशा सणावाराच्या दिवशी ताज्या होतात. मग सणांमध्ये आलेला तो कोरडेपणा आणखी गडद होतो.

मराठी नववर्षाचा उत्साह ओसंडला

Last Updated: Friday, March 23, 2012, 15:59

आज गुढीपाडवा. हिंदु नववर्षदिन, या नववर्षदिनाचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गिरगावात पारंपरिक वेशभूषा करून आबालवृद्ध घराबाहेर पडलेत.. ढोल-ताशांच्या गजरात, लेझिम पथकाच्या साथीनं सा-यांनी स्वागतयात्रेचा आनंद घेतला.

गुढीपाडवा : बिग बी, माधुरी, रितेशच्या शुभेच्छा

Last Updated: Friday, March 23, 2012, 15:33

आपल्या चाहत्यांना पाडवा सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिबूडमधील स्टार मंडळीनी ट्विट केले आहे. यात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांचा समावेश आहे. नुतन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे. गुड लक, हा सण समृद्धी आणि खूशीचा जावो.

बंदचा फटका, गुढीपाडव्याला सोनेटंचाई

Last Updated: Friday, March 23, 2012, 13:33

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांची आज सोनंटंचाईमुळे गैरसोय होऊ शकते. त्यामुळे साडेतीन मुहुर्तावर सोनं घेणा-यांनी घाई करणं गरजेचं आहे. सराफा व्यापा-यांच्या संपामुळे घाऊक बाजारपेठा बंद असल्यानं बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

गुढीपाढवा आणि मराठी वर्षाचा जल्लोष

Last Updated: Friday, March 23, 2012, 09:54

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत लालबागमध्येही गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला उत्साहाचं वातावरण होतं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. तसंच मशाल पेटवून शोभायात्रा काढण्यात आली.