अभंग - न्यूजरूम माझी पंढरी, बातमी विठ्ठल !

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 22:46

प्रिय वाचकांनो, मागील आठवड्यात `तुकाराम` चित्रपट पाहिला. स्टार प्रवाहवर, ( हे चॅनेल चांगला चित्रपट असेल तरच पाहिलं जातं. ) या चित्रपटात संतू तेली हे पात्र होतं. लहानपणी सगळ्याच संतोष नावाच्या मुलाला संत्या म्हणतात. काहींना संतूही म्हणतात. त्याला मी अपवाद नाही.

पुन्हा विद्यापीठात जाताना...

Last Updated: Monday, July 9, 2012, 19:26

संतोष गोरे
शाळा आणि कॉलेजपेक्षाही मला विद्यापीठ जास्त भावलं. कारण मी तिथं प्रेमात पडलो होतो. थांबा, मी इथं कोणताही गौप्यस्फोट करणार नाही. मी प्रेमात पडलो होतो, ते आमच्या विद्यापीठातल्या जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या... तिथली दोन वर्ष, तिथं भेटलेले सहकारी अजूनही माझ्या आठवणीत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मुलाला शाळेत जाताना पाहून माझीही पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत होत होती. अर्थात शाळेत शिकण्याची नव्हे, तर पुन्हा विद्यापीठात शिकण्याची.

अमरावतीतली पत्रकारिता

Last Updated: Monday, April 23, 2012, 16:50

संतोष गोरे 20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा.