बन्सल यांच्या राजीनाम्याचा मुंबईकरांना फटका!

Last Updated: Monday, May 13, 2013, 17:39

बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर पूर्णवेळ मंत्रीच नाही. त्यातच महत्त्वाची पदं रिक्त आहेत. त्यामुळे निर्णयप्रक्रियाच ठप्प झाली आहे. या सगळ्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.

लोकलच्या गर्दीने घेतला ३ जणांचा बळी

Last Updated: Monday, December 31, 2012, 21:17

लोकलच्या गर्दीने तिघांचा बळी घेतलाय. लोकलमधून पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी-घाटकोपर दरम्यान घडली आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

प. रेल्वेचा वाढला वेग, फेऱ्याही वाढणार का?

Last Updated: Thursday, March 8, 2012, 08:35

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पुर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे. तेव्हा गर्दीच्या वेळी दोन लोकल गाड्यांमधील वेळ ही तीन मिनीटांपेक्षा कमी करणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर चर्चगेट ते अंधेरी असा डीसी ते एसी विद्यूत परिवर्तनाचा शेवटचा टप्पा नुकताच झाला. यामुळे या संपूर्ण उपनगरीय रेल्वे मार्गाचे एसीमध्ये विद्युत परिवर्तन पूर्ण झाले. या परिवर्तनामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवण्यास मदत होणार आहे. यामुळे जास्त अंतराच्या दोन रेल्वे स्थानकांमध्ये तर लोकल , १०० किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. तेव्हा पश्चिम रेल्वे मार्गावरच्या उपनगरीय वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेनं केली आहे. लोकलचा वेग वाढवल्यास जास्त गाड्या सुरु करणे शक्य असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. जीवघेणी गर्दी अशी पश्चिम रेल्वेच्या या उपनगरीय मार्गाची ओळख आहे. एकुण १२१४ लोकलच्या फेऱ्या तब्बल ३० लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करतात. तेव्हा लोकलचा वेग वाढल्यास तीन मिनीटांचा कालावधी कमी करता येणे शक्य होणार आहे.