राज ठाकरे हे नकलाकार - सुशीलकुमार शिंदे

Last Updated: Sunday, March 3, 2013, 19:30

राज ठाकरे हे नकलाकार असून ते नकलाच करणार असा टोला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. गेल्या आठवड्यात झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिंदे यांची खिल्ली उडविली होती. याची परतफेड शिंदे यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषेदेत केली आहे.