Last Updated: Sunday, March 3, 2013, 19:30
www.24taas.com, सोलापूरराज ठाकरे हे नकलाकार असून ते नकलाच करणार असा टोला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. गेल्या आठवड्यात झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिंदे यांची खिल्ली उडविली होती. याची परतफेड शिंदे यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषेदेत केली आहे.
सुशीलकुमार शिंदे म्हणजे राजकारणातील शशी कपूर आहेत. सतत एकच बडबड करत असतात. मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं हे एकच तुणतुणं त्यांचं सुरू असतं, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. सोलापूर येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सुशीलकुमारांची टिंगल केली होती. मला सोनिया मॅडमनी हे दिलं, एक दलित असूनही मला त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर नेलं... तुम्ही काय केलं दलित बांधवासाठी? असा सवालही राज ठाकरेंनी केला होता.
दिल्ली रेप प्रकरणातील त्यांना प्रश्न विचारलं तरी तेच मी एक पट्टेवाला होता, मग मला गृहमंत्री केलं हेच उत्तर सुशीलकुमार देत असतात, असंही राज ठाकरे म्हणाले होते. या टीकेला आज सोलापुरातच सुशीलकुमार शिंदेंनी उत्तर दिलं आहे.
First Published: Sunday, March 3, 2013, 19:30