वाहन बाजार चालकांच्या व्यवहारांबाबत पोलीस गंभीर नाहीच

Last Updated: Thursday, September 26, 2013, 19:21

पोलीस आयुक्तांनी सर्व वाहन बाजार चालकांना दैनंदिन व्यवहाराची माहिती देणं सक्तीचं केलं होतं. मात्र या घोषणेला आता वर्ष उलटून गेलं तरीही ना वाहन बाजार चालक या आदेशाला गांभीर्यानं घेत नाहीत. आणि पोलीस अधिकारीही याबद्दल गंभीर नाहीत.

नाशिक पोलिसांचं मिशन... 'ऑल आऊट'

Last Updated: Sunday, July 29, 2012, 14:56

शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलीस शुक्रवारी पुन्हा एकदा अचानक रस्त्यावर उतरले. या मिशनअंतर्गत ४२४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. तर १९२९ वाहनांची तपासणी करण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन वर्गणी उकळणाऱ्यांवर तक्रारी करण्याचं आवाहन केलं.

पोलीस स्टेशनसमोरच महिले घेतले जाळून

Last Updated: Sunday, June 3, 2012, 21:13

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये केरोसिन ओतून जाळून घेण्याचा एका महिलेने प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. रत्ना शेजवळ नावाच्या या महिलेनं पोलीस स्टेशनच्या आवारातून जाळून घेत थेट स्टेशनमध्ये धाव घेतली.

पोलिसांच्या होर्डिंगबाजीवर नाशिककरांची नाराजी

Last Updated: Sunday, January 1, 2012, 21:34

निवडणुकांचा मौसम असल्यानं विविध पोस्टर्समुळे नाशिक बकाल झालं आहे. त्यातच आता भर टाकली आहे ती वाहतूक पोलिसांनी. त्यामुळे नाशिककर आणखी वैतागलेत. जुन्या गंगापूर परिसरात उभारण्यात आलेलं हे होर्डिंग सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतं आहेत. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे फोटो, त्यांच्यावर केलेली कारवाई यांची माहिती लावण्यात आली आहे. अशीच होर्डिंग्ज तीन ते चार ठिकाणी लावण्यात आली आहेत