केजरीवाल यांनी काँग्रेसला `आप` केले, सत्तेचा गोंधळ सुरू

Last Updated: Saturday, December 14, 2013, 09:05

नवी दिल्लीतील निवडणुकीनंतरचा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेचा तिढा सुटणार की नाही, असेच दिसून येत आहे. काँग्रेसने आधी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या पाठिंब्याचे पत्र नायब राज्यपालांना दिले होते. परंतु आम्हाला बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही असे सांगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसने देऊ केलेला बिनशर्थ पाठिंबा धुडकावला आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

माझा नाही, हा दिल्लीकरांचा विजय - अरविंद केजरीवाल

Last Updated: Sunday, December 8, 2013, 17:35

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा तब्बल २२ हजार ६८२ मतांनी पराभव केला. त्यानंतर केजरीवाल यांनी हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय असल्याची प्रतिक्रिय़ा दिलीय.