Last Updated: Sunday, December 8, 2013, 17:35
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा तब्बल २२ हजार ६८२ मतांनी पराभव केला. त्यानंतर केजरीवाल यांनी हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय असल्याची प्रतिक्रिय़ा दिलीय.
दिल्लीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे. आम आदमी पक्षानं काँग्रेस भाजपला धक्का देत अनेक जागांवर विजय मिळवत यश संपादन केलंय. अरविंद केजरीवालांनी जबरदस्त करिष्मा दाखवत दिल्लीतून काँग्रेसचा पुरता सफाया केलाय.
केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं दिल्लीत जोरदार मुसंडी मारलीय. आपच्या झाडूनं काँग्रेसचा जणू सफायाच केलाय. त्यामुळं आपला पराभव स्वीकारत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी राजीनामा दिलाय.
दिल्लीत पूर्ण ७० जागांचा कल स्पष्ट झालाय. काँग्रेसची तिसऱ्या स्थानावर पिछेहाट झालीय. भाजप ३३ जागांवर पुढं आहे. तर आम आदमी पक्ष २६ जागांवर पुढं आहे. काँग्रेस मात्र केवळ ८ जागांवर पुढं आहे. तर तीन जागांवर इतर पक्ष पुढं आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हि़डिओ
First Published: Sunday, December 8, 2013, 17:26