अपघाताची जबाबदारी स्वीकारत द.कोरियाच्या पंतप्रधानांचा राजीनामा

Last Updated: Sunday, April 27, 2014, 17:51

दक्षिण कोरियाचे पंतप्रधान चंग हाँग वोन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. 11 दिवसांपूर्वी फेरी बोटला झालेल्या अपघाताची पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत हा राजीनामा दिलाय. या अपघातात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

द. कोरियात जहाज पलटल्यानं 476 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 10:09

दक्षिण कोरियाच्या दक्षिण तटावर जहाज समुद्रात पलटलंय. त्यामुळं जहाजात असलेल्या 476 प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तटरक्षक जहाजं आणि हेलिकॉप्टर कामाला लागले आहेत. जहाजामधील प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत. तटरक्षक दलाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार जहाज समुद्रात उतरलं आणि पाण्यात बुडालं.

आण्विक दहशतवादाचा धोका - पंतप्रधान

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 16:01

जगाला आण्विक दहशतवादाचा धोका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. ते अणु शिखर परिषदेत बोलत होते.