Last Updated: Sunday, January 12, 2014, 11:00
दोन टेस्ट आणि पाच वन-डे च्या सीरिजसाठी टीम इंडिया न्यूझीलंडला आज सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी आजवर नेहमीच निराशाजनक झालीय. मात्र आता आमची टीम स्थिर झाली असून आता आम्ही कोणत्याही मैदानावर चांगली कामगिरी करु असा विश्वास कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं व्यक्त केलाय.