Last Updated: Sunday, January 12, 2014, 11:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदोन टेस्ट आणि पाच वन-डे च्या सीरिजसाठी टीम इंडिया न्यूझीलंडला आज सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी आजवर नेहमीच निराशाजनक झालीय. मात्र आता आमची टीम स्थिर झाली असून आता आम्ही कोणत्याही मैदानावर चांगली कामगिरी करु असा विश्वास कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं व्यक्त केलाय.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग या दिग्गजांच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. त्यामुळं यंगिस्तानची चांगलीच कसोटी असेल.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ सालचा वर्ल्डकप होत आहे. त्या दृष्टीनं टीम इंडियासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या विश्वचषकाच्या तयारीसाठी हा दौरा महत्वपूर्ण आहे, असं धोनीनं म्हटलंय.
“आमच्या संघात नवे खेळाडू आहेत. त्यांची कामगिरी सध्या चांगली आहे. त्यामुळं ही एक आव्हानात्मक सीरिज होईल”, असा विश्वास धोनीनं व्यक्त केला. शिवाय आगामी वर्ल्डकप न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होत असल्यामुळं युवा खेळाडूंना तिथल्या विकेटचा अनुभव मिळेल, असंही तो म्हणाला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 12, 2014, 11:00