खा. सुप्रिया सुळे अडचणीत

Last Updated: Friday, February 3, 2012, 08:27

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळलेत. तसेच सुळे यांच्या सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कागदपत्रांचा शोध घेण्यासंदर्भात न्यायालयानं सिंगापूरच्या दूतावासाला विनंती पत्र पाठवलं आहे. त्यामुळे सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे.