खा. सुप्रिया सुळे अडचणीत - Marathi News 24taas.com

खा. सुप्रिया सुळे अडचणीत

www.24taas.com, पुणे
 
पुण्यामध्ये आणखी एक जमीन घोटाळा समोर आलाय. सरकारी जमीन खासगी कंपनीला परस्पर विकण्यात आल्याचा प्रकार घडलाय.
 
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळलेत.
 
दरम्यान,  खासदार सुप्रीया सुळे यांच्या सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कागदपत्रांचा शोध घेण्यासंदर्भात न्यायालयानं सिंगापूरच्या दूतावासाला विनंती पत्र पाठवलं आहे.
 
मृणालीनी काकडे यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात याचिका दाखल केलीये. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राजकीय प्रभाव वापरुन सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयीची कागदपत्रे उपलब्ध होऊ दिली नाहीत. असा आरोपही मृणालीनी काकडे यांनी केलाय.
 

 

First Published: Friday, February 3, 2012, 08:27


comments powered by Disqus