Last Updated: Sunday, February 2, 2014, 23:18
एका तरुणानं भर गर्दीत हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या कानशिलात लगावली. पानिपत इथं विविध उद्घाटन कार्यक्रमांसाठी हुडा आले होते. त्यावेळी एका ओपन जिपमधून ते जनतेला अभिवादन करत जात होते. त्याच वेळी कमल मुखिजा नावाचा एक युवक सुरक्षाचक्र भेदून त्यांच्याजवळ आला आणि त्यानं हुडा यांच्या श्रीमुखात भडकवली.