८६ दिवसांनंतर केदारनाथचे दरवाजे भक्तांसाठी खुले!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 09:45

कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिरात आज ८६ दिवसांनंतर पूजा करण्यात आलीय. सकाळी ७ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर शुद्धिकरण पूजा करण्यात आली.

मोदींचे ‘दर्शन’ घ्याचे असेल तर ५ रुपये द्या- भाजप

Last Updated: Monday, July 15, 2013, 18:40

गुजरातचे मुख्यमंत्री आणि हिंदुत्वाचे आयकॉन नरेंद्र मोदी यांची वाढत्या लोकप्रियतेला ‘कॅश’ करण्याचा भाजप कोणताही चान्स सोडत नाही. पुढील महिन्यात हैदराबाद येथे सभा होणार असून, सभेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रत्येकी पाच रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागणार आहे.

उत्तराखंड : ५७४८ बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार?

Last Updated: Monday, July 15, 2013, 14:10

बचावकार्य पूर्ण झालं असलं तरीही अजूनही ५७४८ लोक बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिलीय.

भाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 13:44

आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.

हेलिकॉप्टर अपघात : ९ जवान शहीद, दोन महाराष्ट्रातील

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 13:37

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व २० जण मृत्युमुखी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. यात दोन महाराष्ट्रीय जवानांसह ९ जवान शहीद झालेत. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर, आणि फ्लाईंग डेटा रेकॉर्डर सापडला आहे. त्यामुळे अपघातचे नेमके कारण कळू शकणार आहे.

हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतरही जवान कर्तव्यासाठी हजर....

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 12:04

उत्तराखंडमध्ये हवामान खराब झाल्यामुळे आज सकाळपासून पुन्हा एकदा हवाई बचावकार्य ठप्प झालंय. केदारनाथ, बद्रिनाथ इथं ढग दाटून आलेत, त्यामुळे एकही हेलिकॉप्टर उड्डाण भरू शकलेलं नाही.

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, ८ ठार

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 18:58

केदारनाथ ते गौरीकुंड येथे बचाव कार्य करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे एम आय -१७ हे हेलिकॉप्टर गौरीकुंड येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या अपघातात पाच क्रू मेंबर आणि तीन इतर ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तराखंड : ९,००० लोक अद्यापि बेपत्ता

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 17:03

उत्तराखंडामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. काल रात्रीपासून गुप्तकाशी परिसरात पाऊस सुरु आहे. या पावसानं बचाव कार्यासमोर आव्हान निर्माण केलंय. जवळपास ९,००० लोक अद्यापी बेपत्ता आहेत. आतापर्यंत ८२२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेय.

उत्तराखंड : बचावकार्याला पावसानं घातला खोडा!

Last Updated: Sunday, June 23, 2013, 13:33

उत्तराखंडच्या गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, अगस्त्यमुनी आणि फाटा या भागाला पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी विळखा घातलाय. त्यामुळे बचावकार्य थांबवावं लागलंय.

केदारनाथ येथील अंगावर काटा आणणारी दृश्य

Last Updated: Friday, June 21, 2013, 19:28

आभाळ फाटल्याने झालेल्या या महाप्रलयात केवळ केदारनाथचे मंदिर आणि त्यातील शिवलिंग अजूनही तसेच आहे. त्याच्या आजुबाजूचा परिसर मात्र पूर्णपणे विखरून गेलाय.