दारूण पराभवानंतर आता मुख्यमंत्री काँग्रेसच्याच ‘टार्गेट’वर!

Last Updated: Sunday, May 18, 2014, 15:36

काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय.

पुण्यात पैसे वाटपावरून कदम, पायगुडेंविरोधात गुन्हा दाखल

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 12:52

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे.

वनमंत्र्यांच्या मुलाचं वनप्रेम वादात

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 13:46

औरंगाबादच्या गौताळा अभयारण्यात राज्याच्या वनमंत्र्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी अभयारण्याचे नियम मोडीत काढत मेळावा साजरा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे वनकर्मचा-यांदेखत हे सर्व घडलं... एव्हढंच नाही तर वनकर्मचाऱ्यांनीदेखील कदम यांच्या या ‘सत्कार्याला’ हातभार लावला.

वन मंत्र्यांच्याच मुलाने तोडला वन कायदा!

Last Updated: Monday, June 18, 2012, 14:47

गौताळा अभयारण्याचे सगळे निकष धाब्यावर बसवत रविवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा युवा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला...