गुड न्यूजः घरगुती गॅस सिलेंडर दरात कपात

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:22

मोदी सरकारमध्ये अच्छे दिन आने वाले है याचा प्रत्यय आज देशातील कोट्यवधी गृहीणांना झाला. विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत २३ रुपये ५० पैशांनी करण्यात आली आहे. रुपया वधारल्यानं आयात किंमतीत घट झाली आहे. आणि त्यामुळं सिलेंडर दरात ही कपात करण्यात आली आहे. तसेच विमान इंधनाच्या किंमतीत १.८ टक्क्यांनी कपात करण्यात आली.

नोकरीची संधी: विमान क्षेत्रात ६० हजार नोकऱ्या जाहीर!

Last Updated: Sunday, March 16, 2014, 12:13

भारतीय विमान क्षेत्रात नोकऱ्यांचा जणू पूरच येणार आहे. विमान कंपन्यांमध्ये नवे विमान दाखल होणार आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाण विमानचालन क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध झालीय.

बेपत्ता मलेशियन विमानाचा वैमानिक महिलांचा शौकीन

Last Updated: Thursday, March 13, 2014, 16:31

मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता विमान बोईंग -777ची शोध मोहीम शुरू आहे. मात्र, या विमानाचा वैमानिक महिलांचा शौकीन होता, अशी बाब पुढे आली आहे. त्याच्या बेपरवाईमुळे 239 व्यक्तींच्या जीवावर हा शौक बेतल्याचे सांगितले जात आहे. कॉकपिटमध्ये महिला प्रवाशांबरोबर मौज मस्ती करण्याचे त्याला आवडायचे, असा दावा अमेरिकन फेडरल एव्हिएशन प्रशासनाने केलाय.

एल अँड टीच्या इमर्जन्सी एव्हिटेशन प्लांटला आग

Last Updated: Thursday, November 21, 2013, 13:59

मुंबईत आज अग्नीतांडव पाहायला मिळाला. एकीकडे बॅक बे आगार परिसरातल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. तर त्यापूर्वी वडाळ्यात ट्रक टर्मिनसमधल्या लोढा बिल्डिंगच्या शेजारी न्यू कफ परेड कंपाऊंडमध्ये एल अँड टीच्या इमर्जन्सी एव्हिटेशन प्लांटला आग लागली होती.

'किंगफिशर एअरलाइन्स'ला दिलासा

Last Updated: Thursday, March 8, 2012, 19:57

इंधनाचा पुरवठा होऊ न शकल्याने किंगफिशर एअरलाइन्सची बुधवारी रात्रीची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली. एका उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, इंधन पुरवठा आज सकाळी सुरळीत झाल्यानंतर किंगफिशर एअरलाइन्सला दिलासा मिळाला.

अजित सिंहांची 'झेप' मंत्रीपदाची खास 'भेट'

Last Updated: Sunday, December 18, 2011, 12:16

राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रिपद देण्यात आल आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक डोळ्यापुढं ठेऊन अजित सिंह यांना स्थान देण्यात आलं आहे.