21 वर्षांखालील तरुण-तरुणींना सिगरेट खरेदी बंदी

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 08:29

तरुण-तरुणींना सिगरेटचे वेसन मोठ्याप्रमात लागले आहे. तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी २१ हून कमी वय असलेल्या तरुण-तरुणींना रविवारपासून सिगारेट खरेदी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी न्यूयॉर्क प्रशासनाने घातली आहे.

ब्रिटनमध्ये दारू, सिगरेट देऊन कैदी महिलांकडून सेक्स

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 12:43

ब्रिटनमधील एका रिपोर्टनुसार तुरुंगातील महिलांच्या वाईट परिस्थितीने एक वेगळेच सत्य पुढे आणले आहे. हे सत्य एका अहवालाचा दावा देऊन करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील जेलमधील महिलांना दारू आणि सिगरेट देऊन याबदल्यात त्यांच्याकडून सेक्स करण्यास भाग पाडले जात आहे.

विमानात सिगारेट पिणं पडलं महाग...

Last Updated: Monday, January 6, 2014, 17:03

विमानात सिगरेट पिण किती महाग पडू शकत हे जर्मनीताल मथियास जॉर्ग या व्यक्तीने या संबंधी कधी विचार देखील केला नसेल. ५४ वर्षीय मथियास जॉर्ग हे सिंगापूर ते ब्रिस्बेन जाणाऱ्या विमानात बसले. विमानात मथियास जॉर्ग यांना सिगरेट पिण्याची तलब लागी आणि त्यांनी विमानातच सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न केला. साडेसात तासाच्या या प्रवासात जॉर्ग यांनी अनेक वेळा विमानात सिगरेट पिण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही बायकोचा धाक!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 12:07

जगातील सर्वांत सामर्थ्यवान व्यक्ती मानल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी बायकोच्या धाकामुळं सिगारेट सोडावी लागल्याचं स्पष्ट झालंय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वाभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना ओबामा यांची ही कबुली त्यांच्या समोरील मायक्रोफोनवर ध्वनिमुद्रित झाली!

शाहरुखला जयपूर कोर्टाची नोटीस

Last Updated: Friday, April 27, 2012, 11:21

जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएल पाचच्या सिझनमधील सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर शाहरुखला जयपूर कोर्टाने नोटीस बजावली आहे. त्यानुसार शाहरूखला २६ मे रोजी उपस्थित राहावे लागणार आहे.

बॉलिवूडचा किंग खान अडचणीत

Last Updated: Thursday, April 12, 2012, 13:04

आयपीएल पाचचा सिझन रंगात आला असताना नवा वाद कोलकाता टीमचा मालक आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याच्यामुळे निर्माण झाला आहे. जयपूरमध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरू असताना चक्क शाहरूख खान सिगरेट ओढत होता. मात्र, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी असताना शाहरूखने याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी आज १२ एप्रिलला होणार आहे.