मनसेचा झेंडा हाती घेतला आणि `तो` तुरुंगातच...

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 15:51

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अटकेनंतर राज्यभर आंदोलनाचे पेव फुटले औरंगाबादही त्यात मागं नव्हतं मात्र या आंदोलनात उतरला म्हणून औरंगाबादच्या एका मनसे कार्यकर्त्याला चांगल्याच वेदना सहन कराव्या लागल्या.. तब्बल ६ दिवस जेलमध्ये त्याला राहावं लागलं आणि कुणीही पदाधिकारी त्याला सोडवायला आले नाही, अखेर कुटुंबियांनीच दागिने गहाण टाकत घरच्या या कर्त्या मुलाची सुटका केली.

पोलिसांची नाकाबंदी, मनसेचे १४ पदाधिकारी अटकेत

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 09:11

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. तर मुंबई-कोल्हापूर बायपासवर चांदणी चौकात रास्तारोको केलाय. निफाड हायवेवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, नाशिक टोल नाक्यावर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आलेय.

राज ठाकरेंना अटक, आरसीएफ पोलीस ठाण्यात राज

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 16:13

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.