www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.
वाशीटोल नाक्यावर आंदोलन करण्यासाठी राज ठाकरे आज कृष्णकुंजवरून वाशीकडे रवाना होत होते. यावेळी त्यांना सायनजवळ पोलिसांनी अडवलं. याठिकाणी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही मागे हटणार नाही, असे नांदगावकर यांनी बजावले. त्याचवेळी पोलिसांनी आम्हाला बळाचा वापर करण्यास भाग पाडू नका, असे स्पष्ट केले. त्यामुळे येथे थोडेसे तणावाचे वातावरण होते. राज यांना अटक केल्यानंतर येथे वाहतुकीची कोंडी झाली.
एक्स्प्रेस वे वर मनसेचा पहिला दणका दिसून आला. मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत झाली आहे. राज्यातल्या टोल नाक्यांना पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. काही ठिकाणी टायरमधील हवा सोडण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
मनसे आंदोलन रोखण्यासाठी नाशिकात शीघ्र कृती दल तैनात कण्यात आली आले आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड होत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे. कायदा मोडणा-यांवर कारवाईचा करण्याचा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रास्ता रोकोचा पहिला दणका मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला बसलाय. लोणावळा जवळ खंडाळा-बोर घाटात आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या गाड्यांची हवा सोडली. मुंबईहून पुण्याला जाणा-या लेनवर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे वाहतूक तासभर ठप्प झाली होती. तर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तीन हात नाक्याजवळ अज्ञात व्यक्तींनी टायर जाळलेत.
आंदोलनाचा घटनाक्रममुंबईतील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.
दुपारी १.०० वाजतामुख्यमंत्र्याचा फोन झाला. उद्या ९ वाजता चर्चा होणार आहे. माझा हेतू साध्य झाला. मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता - राज ठाकरे
सकाळी १२.५८ वाजतामनसेचे टोल विरोधी आंदोलन तूर्तास मागे
राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन
दुपारी १२.५० वाजताराज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन
दुपारी १२.४५ वाजताराज ठाकरे यांना पोलिसांनी सोडलं
उद्या सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चर्चा
सकाळी ११.४२वाजतासर्व काही शांततेच्या मार्गाने चाललं असताना राज यांना अटक का - शर्मिला ठाकरे
सकाळी ११.३० वाजताविक्रोळी येथे अज्ञाताला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण
सकाळी ११.२२ वाजताऔरंगाबादमध्ये हिंसात्मक आंदोलन...
काही ठिकाणी दगडफेकीचे वृत्त
सकाळी ११.२१वाजताठाण्यात काही ठिकाणी दुकाने बंद करण्यास सुरूवात
सकाळी ११.२०वाजताआंदोलनाची तीव्रता कमी झाल्यानंतर राज ठाकरेंना सोडू - पोलीस
सकाळी ११.१९ वाजताराज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत कार्य़कर्ते आक्रमक
राज अटकेनंतर मनसे कार्यकर्त्यांचा ठिय्या
सकाळी ११.१५ वाजताराज ठाकरेंसोबतचा कार्यकर्त्यांचा ताफा आरसीएफ पोलिसांनी रोखला
राज अटकेनंतर मनसे कार्यकर्त्यांचा ठिय्या
सकाळी ११.०२ वाजताशर्मिला ठाकरे यांचा आरसीएफ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा ठिय्या
सकाळी १०.५७ वाजताराज ठाकरे यांना अटक केल्यानंतर मनेस कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरू
वाहतुकीची कोंडी कायम...कार्यकर्ते रस्त्यावरच
सकाळी १०.५० वाजताराज ठाकरे यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेणार
आमदार नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांना अटक
सकाळी १०.४२ वाजताचुनाभट्टी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी
कार्यकर्ते आक्रमक...मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र
राज ठाकरे यांना पोलिसांनी केली अटक
सकाळी १०.३७ वाजताराज ठाकरे यांना पोलिसांनी केली अटक
वाशीकडे जाताना केली अटक
सकाळी १०.३५ वाजताराज ठाकरे पोलिसांच्या ताब्यात
सकाळी १०.३० वाजताराज ठाकरे गाडीतून रस्त्यावर उतरलेत
पोलिसांनी रोखल्याने चुनाभट्टी येथे वाहतूक जॅम
सकाळी १०.२५ वाजताराज ठाकरे यांची गाडी सायन येथे पोलिसांनी रोखल्याने पोलिसांशी चर्चा
नितीन सरदेसाई, बाळा नादगावकर यांनी चर्चा..गाडी सोडा नाहीतर इथंच बसू
सकाळी १०.२० वाजताराज ठाकरे यांची गाडी सायन येथे पोलिसांनी रोखली
सकाळी १०.१८ वाजताराज ठाकरे यांना सायन येथे पोलिसांनी रोखले
वाशीकडे जात असताना राज यांना अडविले
सकाळी १०.०७ वाजताराज ठाकरे थोड्याच वेळात वाशी टोल नाक्यावर पोहोचणार
वाशी येथे मोठा पोलीस फौजफाटा तैनात
सकाळी १०.०२ वाजताराज ठाकरे आंदोलनासाठी कृष्णकुंजवरून रवाना
वाशी टोल नाक्याकडे राज यांची कुच
बीड : सकाळी ९.२० वाजताधुळे- सोलापूर हायवेवर पेंडगावजवळ मनसेच्या रास्ता रोकोला सुरुवात, वाहतूक विस्कळीत
नाशिक: सकाळी ९.१५ वाजता मनसे आमदार वसंत गीते यांच्यासह १३ नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात
सकाळी ९.००वाजतानिफाड हायवेवर आंदोलन सुरू
नाशिक टोल नाक्यावर पोलिसांची नाकाबंदी
सकाळी ८.५० वाजतानाशिकमध्ये मनसे महिला आक्रमक...टोलनाक्यावर गाड्या रोखल्या.
सकाळी ८.४० वाजताखारेगाव टोल नाक्याजवळ मनसे कार्यकर्ते आक्रमक
तीनहात नाक्यावर टायर जाळले
सकाळी ८.३० वाजता-रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू
-आंदोलनाचा १२ परीक्षेवर परिणाम नाही
-शाळा, रिक्षा, टॅक्सी सुरू
- मनसेच्या रास्तारोकोचा वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही
सकाळी ७.४५ वाजतामनसे कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड. १० ते १५ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
सकाळी ७,४७वाजताखारेगाव टोपे नाका बंद करण्याचा प्रयत्न. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
सकाळी ७.३० वाजताठाण्यात दोन ठिकणा टायर जाळलेत...इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तीन हात नाक्याजवळ अज्ञात व्यक्तींनी टायर जाळलेत.
सकाळी ७ वाजताअमृतांजन पुलाजवळ रास्तारोको.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 12, 2014, 08:02