रूपया घसरला : सोने ३० हजारी पार, बाजार गडगडला

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:26

घसरणाऱ्या रुपयाला टेकू देण्यासाठी आणि वित्तीय तूट कमी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क वाढविल्याने सोने दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी १०९४ रूपयांनी वाढ होऊन सोने ३०४१२ प्रति तोळा झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया ६२ रूपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झालाय. बाजार कोसळला आहे.

सोने दरात मोठी घसरण

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 10:46

सोन्याने काल २०० रूपयांनी उसळी मारली होती. मात्र, आज सोने दर एकदम खाली आला. सोने २४,९७० रूपये प्रति तोळा झाले आहे. गेल्या दोन आठवड्यातील निच्चांकी घसरण आहे.

सोने, चांदी दरात पुन्हा घसरण

Last Updated: Saturday, June 22, 2013, 17:33

गेल्या दोन आठवड्यातील सोन्याच्या भावात झालेली ही सगळ्यात मोठी घसरण आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली असून प्रतितोळ्यामागे ६२० रुपयांची घसरण झाली आहे.