रूपया घसरला : सोने ३० हजारी पार, बाजार गडगडला, Rupee hits record low of 62 Vs dollar

रूपया घसरला : सोने ३० हजारी पार, बाजार गडगडला

रूपया घसरला : सोने ३० हजारी पार, बाजार गडगडला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

घसरणाऱ्या रुपयाला टेकू देण्यासाठी आणि वित्तीय तूट कमी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क वाढविल्याने सोने दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी १०९४ रूपयांनी वाढ होऊन सोने ३०४१२ प्रति तोळा झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया ६२ रूपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झालाय. बाजार कोसळला आहे.

घसरणाऱ्या रुपयाला आधार देण्यासाठी केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क दहा टक्क्यांवर नेले. त्यामुळे सोने दरात वाढ होण्याचे संकेत होते. सोन्याचा मंगळवारी भाव प्रति दहा ग्रॅम २९, ६६० रुपये होता. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आयात शुल्कातील आतापर्यंतच्या वाढीमुळे ग्राहकांना सोने जवळपास २५०० रुपये प्रति दहा ग्रॅम महाग पडत आहे. आज सकाळी सोने दराने उसळी मारल्याने सोने ३० हजारांचा टप्पा पार केला.

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या घडामोडींचा रूपयावर परिणाम झाला आहे. रूपयाला सावरण्याचा प्रयत्न होत असला तरी डॉलरच्या तुलनेत ६२ रूपयांच्या घरात रूपया गेलाय. हा रूपयांचा निच्चांक आहे. याचा सर्वपरिणाम शेअर मार्केटवर दिसून आलाय. शेअर मार्केट कोसळले आहे. आतापर्यंतची रुपयाची ही सर्वात निचांकी घसरण आहे. तर सेन्सेक्सही ५००अंकांनी गडगडला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 16, 2013, 10:53


comments powered by Disqus