कोकण रेल्वेचा प्रवास होणार सुखकर

Last Updated: Monday, April 22, 2013, 16:10

कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आता काहीप्रमाणात सुखकर होणार आहे. सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन ३८ विशेष गाड्या तर जनशताब्दी, राज्यराणी एक्स्प्रेस या गाडींचे डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीवर थोडासा दिलासा मिळणार आहे.

पावसाचा तडाखा, कोकण रेल्वे ठप्प

Last Updated: Friday, July 20, 2012, 18:43

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. विलवडे ते वैभवाडी दरम्यान सायंकाळी ४.३० वाजता कोकण रेल्वे रूळावर दरड कोसळ्याने कोकण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. वैभवाडीत जनशताब्दी थांबून ठेवण्यात आली आहे. रूळावरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.