बाबा रामदेव फसले; पैशाची देवाण-घेवाण चव्हाट्यावर

Last Updated: Friday, April 18, 2014, 12:43

योग गुरू बाबा रामदेव आणि भाजपचे उमेदवार महंत चंदनाथ यांच्यातली पैशांची देवाण-घेवाण चव्हाट्यावर आलीय. खुद्द बाबा रामदेवांनीच ही पैशांची देवाण-घेवाणबद्दल माईकसमोर कथन केलीय... पण, अनावधानानं.

अबब...मुंबईतील नेत्यांची किती ही संपत्ती

Last Updated: Wednesday, April 2, 2014, 13:06

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुतांश उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. तसे त्यांनी आपल्या अर्जासोबत पत्रही दिलं आहे. मुंबईतील उमेदवार यांच्या संपत्तीवर नजर टाकली असता हे दिसून येत आहे. राखी सावंत, संजय निरूपम, गोपाळ शेट्टी, गुरुदास कामत यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रावर संपत्तीचा उल्लेख पाहता येतो.

भुजबळांच्या उमेदवारीला विरोध, मनमाडमध्ये रास्तारोको

Last Updated: Saturday, March 1, 2014, 17:51

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. आज येवला बंदची हाक देण्यात आलीये. मनमाड-नगर रस्त्यावर रास्तारोको करण्यात आलाय. भुजबळांच्या उमेदवारीला विरोध होतोय.

छगन भुजबळांचा शरद पवारांनी केला गेम!

Last Updated: Saturday, March 1, 2014, 11:17

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी त्यांचा गेम केल्याची खमंग चर्चा रंगलीय. अनेक दिग्गज मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असं आधी पवारांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात एकट्या भुजबळांनाच लोकसभेवर पाठवून पुतणे अजित पवारांचं वर्चस्व वाढवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे की काय, असं बोललं जातंय. त्यामुळं भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय.

लोकपाल विधेयक मंजूर करा - बाबा रामदेव

Last Updated: Thursday, August 9, 2012, 16:01

जनलोकपालाचा अण्णांचा अजेंडा आता बाबा रामदेव यांनी आपल्या हाती घेतलाय. लोकपालाबाबत संशोधन होत राहिल मात्र विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी बाबा रामदेवांनी केलीय. तीन दिवस बाबांचं लाक्षणिक उपोषण असणार आहे. त्यानंतर ते आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत.