मोदींच्या `विजय` यात्रेस दिल्लीत सुुरुवात

Last Updated: Saturday, May 17, 2014, 12:32

विजयानंतर सबका साथ, सबका विकास, असा नवा नारा देत देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बडोद्यात जोशपूर्ण आणि भावपूर्ण भाषण केलं. सुरुवातीलाच त्यांनी बडोद्याच्या जनतेचे आभार मानले. आजपासून चांगले दिवस सुरू झालेत. देशातल्या जनतेसाठी शरीरातला कण न् कण आणि क्षण अन् क्षण वेचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशा विश्वास त्यांनी देशातल्या जनतेला दिला. आज नवी दिल्लीत भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, विमानतळापासून त्यांच्या `विजय`यात्रेस सुरुवात झाली आहे.

अमेठीत मतदान केंद्रात फळ्यावर `कमळ`, राहुल गांधी संतापलेत

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 18:25

अमेठीत आज आठव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मात्र, एका मतदान केंद्रावर फळ्यावर `कमळ` असल्याने यावर आक्षेप घेण्यात आलाय. ही बातमी कळताच काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठी लोकसभा मतदार संघातील उमेदवार राहुल गांधी संतापले. आपण याबाबत तक्रार करणार असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केलेय.

माधुरी दीक्षित बनणार 'श्यामची आई'

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 14:22

'श्यामची आई' पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नव्या श्यामची आईमध्ये आईची भूमिका साकारणार आहे माधुरी दीक्षित. महेश मांजरेकर यांनी श्यामची आईवर सिनेमा काढण्याचा निश्चय केला आहे. यामध्ये श्यामच्या आईच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितला विचारण्यात आलं आहे.

ग्रँट रोडच्या 'लोटस बार'वर छापा

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 07:57

मुंबईत ग्रँट रोड परिसरात मध्यरात्री मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेनं लोटस बारवर छापा टाकून १५ मुलींना ताब्यात घेतलं आहे.