छेड का काढली विचारले, त्यालाच जीवे मारले..

Last Updated: Thursday, April 19, 2012, 07:34

मैत्रिणीची छेड काढणाऱ्या गुंडांना हटकणाऱ्या युवकाला, आपले प्राण गमवावे लागल्याची घटना मुंबईत घडली आहे. मागच्या वर्षी अंधेरीतल्याच दोन युवकांची याच कारणावरून गुंडांनी हत्या केली होती. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.