वाशी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विजयी, पालघर पालिकेकडे लक्ष

Last Updated: Sunday, March 23, 2014, 23:42

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्रमांक 48 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी रमेश शिंदे यांचा दविजय झाला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शिंदे यांचा 290 मतांनी पराभव केला. तर पालघर नगरपरिषदेसाठी आज 74 टक्के मतदान झालं.

नगराध्यक्षाने नगरपरिषदेतील सीसीटीव्हीच चोरले

Last Updated: Monday, December 17, 2012, 17:05

नगराध्यक्षांनेच नगरपरिषदेत चोरी केल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय. पालघरचे नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर नगरपरिषदेतले सीसीटीव्ही चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पाटील यांच्यासह पाच नगरसेवकांवर चोरीचा गुन्हा दाखल झालाय.

पनवेल निवडणुकीत यंदा मनसेही

Last Updated: Thursday, November 24, 2011, 15:55

पनवेल नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा मनसेही उतरणार आहे. नगरपरिषदेच्या आखाड्यात मनसे पहिल्यांदाच उतरणार असल्यानं सत्ताधाऱ्यांना आणखी एक वेगळं आव्हान असणार आहे.