Last Updated: Monday, December 17, 2012, 17:05
www.24taas.com, पालघरनगराध्यक्षांनेच नगरपरिषदेत चोरी केल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय. पालघरचे नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर नगरपरिषदेतले सीसीटीव्ही चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पाटील यांच्यासह पाच नगरसेवकांवर चोरीचा गुन्हा दाखल झालाय.
पालघर नगरपरिषदेच्या मुख्यालयातून सीसीटीव्ही यंत्रणा चोरुन नेल्याचा या पाचही जणांवर आरोप आहे. पालघर पोलीस ठाण्यात या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. नगरपरिषदेचे कर्मचारी अरुण जाधव यांनी चोरीची तक्रार दाखल केलीये. या तक्रारीत 4 सीसीटीव्ही कॅमेरे चोरल्याची तक्रार करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नगराध्यक्ष नंदकुमार पाटील,परेश पाटील, अतुल पाठक,आणि दिनेश बाबर फरार झालेत.
नगरपरीषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवसेना पुरस्कृत नगराध्यक्ष असून सेनेची सत्ता आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीं नगरसेवकांना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी मोर्चा काढला होता.
First Published: Monday, December 17, 2012, 16:59