महिलेला विवस्त्र करून पूजा मांडणाऱ्या मांत्रिकासह दोघांना अटक

Last Updated: Saturday, December 21, 2013, 15:31

राज्य सरकारने नुकताच संमत केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार पहिला गुन्हा पुण्यात दाखल झालाय. वैयक्तिक समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी एका महिलेला विवस्त्र करून पूजा मांडण्याच्या तयारीत असलेल्या मांत्रिकासह दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केलीय.

जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 22:28

ऐतिहासिक जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेनंतर आता विधान परिषदेतही मंजूर झालंय.. अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे.

विधानपरिषदेत जादूटोणाविरोधी विधेयक संमत होणार?

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 09:54

विधानपरिषदेत आज जादूटोणाविरोधी विधेयक संमत होण्याची शक्यता आहे. हे विधेयक कालच विधानपरिषदेत मांडण्यात आलंय. या विधेयकातल्या तरतूदींना शिवसेना-भाजपचा विरोध आहे. तरी हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे आज या विधेयकावर शिक्कामोर्तब होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

जादूटोणा विरोधी विधेयक रखडलं, नव्याने तरतूदी

Last Updated: Friday, December 13, 2013, 08:16

जादूटोणा विरोधी विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. पण हे विधेयक आजचा किंवा किंवा सोमवारी संमत होण्याची शक्यता आहे. विधानसभेत ओल्या दुष्काळावर सुरू असलेली चर्चा लांबल्याने जादूटोणा विरोधी विधेयकावर परवा सुरू झालेली चर्चा काल झालीच नाही. त्यामुळे हे विधेयक रखडलं.