Last Updated: Wednesday, December 18, 2013, 22:28
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरऐतिहासिक जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेनंतर आता विधान परिषदेतही मंजूर झालंय.. अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे.
मात्र या विधेयाकाच्या चर्चेदरम्यानच वाद झाल्यामुळं भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी सभात्याग केल्याचं गालबोट या विधेयकाला लागलं. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारवर दबाव आला होता.
विधानसभेत ओल्या दुष्काळावर सुरू असलेली चर्चा लांबल्याने जादूटोणा विरोधी विधेयकावर गेल्या आठवड्यात सुरू झालेली चर्चा या आठवड्यात झाली नव्हती. त्यामुळे हे विधेयक रखडलं होतं. मात्र, आज हे विधेयक मंजूर करण्यात आलंय.
दरम्यान, जादूटोणा विधेयकाच्या सरकारने मांडलेल्या मसुद्यात बदल करण्यात आलेत. जादुटोणा विधेयकाचा नवा मसुदा झी २४ तासच्या हाती आला होता. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा या नव्या मसुद्यात समावेश करण्यात आला आहे.
विधेयकात काय तरतुदी आहेत?
- जुन्या मसुद्यात कोणीही तक्रार करण्याची तरतूद होती. मात्र नव्या मसुद्यात पिडीत व्यक्ती किंवा त्याचे कुटुंबियच तक्रार करू शकतात.
- जुन्या मसुद्यात खालील कुठल्याही गोष्टींची स्पष्टता नव्हती, ती नव्या मसुद्यात स्पष्ट करण्यात आली आहे.
आता यावर कोणतेही बंधन नाही
- कोणत्याही धार्मिक वा आध्यात्मिक स्थळाच्या ठिकाणी प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा, पंढरपूरची वारी
- हरिपाठ, कीर्तन, प्रवचने, भजने
- पारंपरिक शास्त्रांचे, प्राचीन विद्या व कलांच्या शिक्षणाचे आचरण, प्रचार व प्रसार
- होऊन गेलेल्या संतांचे चमत्कार सांगणे, त्यांचा प्रचार, प्रसार, साहित्य वितरण करणे
- कोणाचेही शारीरिक वा आर्थिक नुकसान न करता आताचे चमत्कार सांगणे व त्यांचा प्रचार-प्रसार करणे
- वैद्यकीय उपचारांपासून परावृत्त न करता – कुत्रा, साप, विंचू चावल्यावर टाकरे जाणारे मंत्र, पारंपरिक मंत्र उपचार, रोग दुरुस्तीसाठी मंत्र उपचार
- मंदिरे, प्रार्थनास्थळे इत्यादी ठिकाणी केले जाणारे सर्व धार्मिक विधी
- गळ्यात किंवा हातात गंडेदोरे, ताईत, जानवे घालणे, बोटात ग्रह खड्यांच्या अंगठ्या घालणे
वास्तुशास्त्रानुसार घरात बदल सांगणे, जोशी ज्योतिषी, नंदीबैलवाले ज्योतिषी, इतर ज्योतितषांद्वारे दिला जाणारा सल्ला, जमिनीखालचे पाणी सांगणारे पाणके, पानाडी, डाऊझिंग करणारे व यावरून सल्ला देणारे जादूटोणा विधेयकाच्या जुन्या मसुद्यात या गोष्टींच स्पष्टता नव्हती, त्यामुळे याबाबत संभ्रम होता. विरोधकांच्या आग्रहानंतर मात्र नव्या मसुद्यात या बाबी समाविष्ट करून ही स्पष्टता करण्यात आली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 18, 2013, 22:28