बीसीसीआयचा द्रविडला सलाम

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 23:43

टीम इंडियाचा 'द वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचा बीसीसीआयकडून आज मुंबईत सत्कार करण्यात आला. यावेळी त्यानं कारकिर्दीतल्या काही आठवणी ताज्या करत सहकाऱ्यांच्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले. या आठवणी सांगताना त्याला अनेकदा गहिवरून आलं.