बारावीचा आतापर्यंतचा सर्वाधिक 90.3 टक्के निकाल, कोकण अव्वल!

Last Updated: Monday, June 2, 2014, 12:54

बारावीचा निकाल जाहीर झालाय. यंदा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजेच 90.3 टक्के एवढा बारावीचा निकाल लागलाय. यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. सर्वच विभागामध्ये मुली अव्वल आहेत. तर विभागांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय.

ऐका हो ऐका: आज ‘12 वी’चा ऑनलाईन निकाल!

Last Updated: Monday, June 2, 2014, 08:37

आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल. बारावीच्या विद्यार्थांना हा निकाल ऑनलाईन बघता येईल. हा निकाल www.mahreslult.nic इन या वेबसाईटवर पाहता येईल. तर 10 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशिट देण्यात येतील.

ज्यांनी शिवसेना सोडली, त्यांना जनतेनं सोडलं!

Last Updated: Friday, May 16, 2014, 18:52

लोकसभा निवडणूक 2016चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यालयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांमधला उत्साह तर खूप वाढलेला दिसतोय. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना यंदा मतदारांनी सोडलंय.