Last Updated: Saturday, May 19, 2012, 11:38
आय़पीएलवर सट्टा लावणा-या चौघांना अटक करण्यात आलीये. हे चारही बुकी असून त्यांनी श्रीलंकन खेळाडूंना पैसे दिल्याचा संशय आहे असा दावा एका इंग्रजी दैनिकानं केलाय. मुंबईच्या लोखंडवाला भागातून या बुकींना अटक करण्यात आली आहे.. या सट्टोखोरांच्या अटकेनं भारतीय खेळांडूवरही संशयाची सुई वळलीय. दरम्यान, या टोळीतील दाऊद टोळीतील छोटा शकीलशी संबंध होता, अशी माहिती आता पुढे आली आहे.